जळगावसह भुसावळात संथगतीने मतदान


अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी

भुसावळ/जळगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असलीतरी पावसाच्या रीपरीपमुळे भुसावळसह जळगावात मात्र पहिल्या दोन तासात अत्यंत संथगतीने मतदान सुरू असल्याचे दिसून आहे शिवाय अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काहीशी खोळंबली मात्र लागलीच दुसरे मशीन लावण्यात आल्यानंतर मतदारांना दिलासा मिळाला.

दोघा अपक्षांनी बजावला अधिकार
भुसावळ विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर व त्यांचे पती डॉ.राजेश मानवतकर यांनी भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये मतदान केले तर दुसरे अपक्ष उमेदवार सतीश घुले यांनीदेखील सपत्नीक भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात मतदान केले.

भुसावळात दोन ठिकाणी ईव्हीएम बंद
भुसावळ शहरातील म्युन्सीपल हायस्कूलमधील केंद्र क्रमांक 133 मध्ये आठ मतदारांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएममध्ये अडचण आल्यानंतर मतदान प्रक्रिया खोळंबली तर लागलीच ईव्हीएम मशीन बदलवण्यात आले तसेच तु.स.झोपे शाळेतील ईव्हीएममध्येही 35 मतदारांनी हक्क बजावल्यानंतर ईव्हीएम बंद पडल्याने तेदेखील बदलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भुसावळात पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान
भुसावळ शहर व तालुक्यात सकाळी सात ते नऊ दरम्यान पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यात 4.55 टक्के पुरूष (7323) मतदार तसेच 2.32 टक्के स्त्री मतदारांनी (3400) हक्क बजावला.

आमदार हरीभाऊ जावळेंनी भालोदमध्ये बजावला हक्क
रावेर विधानसभेचे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार हरीभाऊ जावळे यांनी भालोद येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. फैजपूरच्या म्युन्सीपल हायस्कूलमध्ये व्हील चेअरची व्यवस्था नसल्याने त्यांनी तत्काळ अधिकार्‍यांशी संपर्क साधला. जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भरत महाजन, माजी संचालक नितीन राणे यांच्यासह शिवसेनेचे आप्पा चौधरी, राजू काठोके, भाजप शहराध्यक्ष संजय रल यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

(अपडेट माहितीसाठी लिंक रीफे्रश करा)









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !