मुक्ताईनगरात खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

रावेर तालुक्यात आठ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड : मतदानाला काहीसा विलंब
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे-खेवलकर, खासदार रक्षा खडसे, मंदाताई खडसे यांनी सोमवारी सहकुटुंब मतदान केले.
जळगावात आमदार भोळेंसह महापौरांचे मतदान
जळगाव शहरातील महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी प्रताप नगरातील प्राथमिक शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. . त्यांच्या सोबत त्यांची पत्नी महापौर सीमा भोळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
रावेर तालुक्यात आठ मतदान यंत्रात बिघाड
रावेर तालुक्यात मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार समोर आले. रावेर येथील आठ ठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आली असून यात मतदानांच्यावेळी तीन ठिकाणी व चाचणीच्या वेळी पाच ठिकाणी यंत्रे बंद पडल्याचा प्रकार घडला. शिवाय रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे पहिलेच मतदान केल्यानंतर यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार घडला. यामुळे मतदान प्रक्रियेला उशिराने सुरवात झाली.
