भुसावळ विधानसभा : पाच वाजेपर्यंत 42 टक्के मतदान


भुसावळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारी सायंकाळी पाच वाजेअखेर 42.23 टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी मात्र पावसाच्या रीपरीपमुळे पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यानंतर पाऊस थांबला असलातरी मतदान केंद्रावर दुपारनंतर मात्र रांगा लागल्याचे चित्र दिसून आले नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत 29.97 अर्थात 30 टक्के मतदान झाले तर दुपारनंतर मतदार हळूहळू बाहेर पडू लागल्याने मतदान केंद्राबाहेर गर्दी वाढल्याचे चित्र होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 70 हजार 59 पुरूष मतदारांनी तर 69 हजार 802 स्त्री मतदारांनी हक्क बलावला तर एकूण एक लाख 29 हजार 861 मतदारांनी हक्क बजावला. एकूण 42.23 टक्के मतदान झाले. दरम्यान, मतदान करण्यासाठी सहा वाजेची मुभा असल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !