भुसावळात निवडणुकीच्या धामधुमीत मनोविकृत चढला जलकुंभावर


यंत्रणेला फुटला घाम : चार तासांच्या प्रयत्नानंतर इसमास खाली उतरवण्यात आले यश

भुसावळ : भुसावळात निवडणुकीच्या धामधुमीत मनोविकृत चढला जलकुंभावरशहरातील नवी ईदगाह जवळील मुस्लीम कॉलनीतील पाण्याच्या जलकुंभावर 30 वर्षीय इसम चढल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न करताच या भागात खळबळ उडाली आहे. शहरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सरू असताच बाजारपेठ पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या इसमास खाली उतरवण्यास यंत्रणेला यश आले.

आत्महत्येच्या प्रयत्नाने उडाली धांदल
वसीम बेग ईस्मिल्ला बेग (30, भुसावळ) या इसमाने नवी ईदगाह भागातील जलकुंभावर चढल्यानंतर सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न चालवला. ही घटना नागरीकांना कळताच मोठी गर्दी जमा झाली तर पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती कळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, हवालदार सुनील जोशी तसेच चालक व एएसआय तस्लीम पठाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वसीम बेग यांना खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वर असलेली शिडीदेखील फेकली त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तर सुरक्षा जाळीदेखील करण्यात येवून संबंधिताला उडी घेण्याचे सांगण्यात आले मात्र संबंधित ऐकण्यास तयार नसल्याने त्यांचे मोठे बंधू घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अथक प्रयत्नानंतर वसीम बेग यांना खाली उतरण्यास यश मिळवल्याने यंत्रणेनेही सुटकेचा श्‍वास घेतला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !