भुसावळ शहर व तालुक्यात मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचार्‍यांची गैरसोय


वरणगाव : विधानसभेच्या निवडणुका सोमवारी संपन्न झाल्या परंतु या कामासाठी नियुक्त केलेल्या विविध विभागातील कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर ती पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत याबाबत निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याची माहिती शिक्षक परीषदेचे एस एस अहिरे व इफ्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर यांनी दिली.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार
ते म्हणाले की लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 26 व 28 (क) नुसार निवडणुकीच्या कामासाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येते या कामात दिरंगाई केल्यास याच नियमाच्या कलम 134 नुसार कारवाईचे संकेत देखील दिले जातात मात्र या नियमानुसार कर्मचार्‍यांना सुविधा देण्याचे प्रावधान असतानादेखील विधानसभा निवडणुकीत सुविधा मिळाल्या नाहीत सोमवारी विधानसभेची निवडणूक संपन्न झाली मागील निवडणुकीचा अनुभव घेता भुसावळ तालुक्यातील शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन निवडणूक कर्मचार्‍यांना पुरेशा प्रमाणात सुविधा द्याव्या अशी मागणी भुसावळातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र या निवडणुकीमध्ये बहुतांश निवडणूक केंद्र हे जिल्हापरिषद असल्याने या ठिकाणी संडास बाथरूम पिण्याच्या पाण्याची सुविधा रात्री झोपण्याची सुविधा यासह इतर सुविधा नसल्याने कर्मचार्‍यांना प्रचंड प्रमाणावर त्रास सहन करावा लागला रात्रीच्यावेळी डासांचे प्रमाण जास्त असल्याने रात्री झोप न झाल्याने त्याचा परिणाम दुसर्‍या दिवशी कामावरती झाला तसेच घरी पोहोचल्यानंतर अनेक कर्मचारी आजारी पडले या निवडणुकीत महिला कर्मचारी व महिला पोलीस अनेक केंद्रांवर नियुक्त करण्यात आले होते महिला कर्मचार्‍यांसाठी देखील पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले सकाळी चार वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत बर्‍याच केंद्रा वर काम सुरू होते यामुळे जेवणासाठी अथवा इतर कामांसाठी सुट्टी झाली नाही जास्त मतदान असणार्‍या केंद्रावर अतिरिक्त कर्मचारी देणे गरजेचे होते परंतु अतिरिक्त कर्मचारी दिले नाहीत नियुक्त्या या एक किंवा दोन तालुके बदलून दिल्याने त्यांना प्रवासासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले सकाळी सात वाजेपासून मतदानाची सुरुवात झाली मात्र दुपारनंतर मतदारा आल्याने उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर ती काम सुरू होते अनेक वेळा निवेदन देऊन देखील संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याने याबाबत कर्मचारी संघटनेकडून गांभीर्याने विचार करून प्रथम जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहे यानंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर जनहित याचिका दाखल करण्याबाबत वकिलांचा सल्ला घेतला जात असल्याची माहिती भुसावळ शिक्षक परिषदेचे एस अहिरे व इफ्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनगर यांनी सांगितले









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !