वरणगाव आयुध निर्माणी कर्मचार्यांचा बोनस खोळंबला

वरणगाव : सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आयुध निर्माणी कर्मचार्यांना दिवाळी बोनस मिळण्यास विलंब होत असल्याचे पत्रक इंडीपेंडट डिफेंस एम्लाईज युनियनने प्रसिद्धीस दिले आहे. बोर्डाला संरक्षण मंत्री यांनी आदेश दिलेले असून फाईल वित्तमंत्री यांच्या स्वाक्षरीसाठी खोळंबली आहे. मंत्री परदेश दौर्यावर असल्याने 41 फॅक्टर्यांचे कर्मचारी बोनस विना आहेत. पत्रकावर संघटनेचे माजी महामंत्री डॉ.देवानंद उबाळे, अजय इंगळे, विजय खंडारे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
