धुळ्यातील तरुणाचा खून प्रकरण : तीनही संशयीतांना पोलिस कोठडी


धुळे : शहरातील चितोड रोड परीसरात मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवाय तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींची न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिल परीसरातील रहिवाशी असलेल्या निखिल साहेबराव पाटील (22) या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मयुर, मनोज व मुकेश शार्दुल या भावंडाविरुध्द धुळे शहर पेालिस ठाण्यात खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरूवारी संपल्याने न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास निरीक्षक नितीन देशमुख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !