भुसावळ हत्याकांडातील आरोपींना उद्या न्यायालयात हजर करणार


जिल्हा कारागृहात नायब तहसीलदारांसमक्ष संशयीत आरोपींची ओळख परेड

भुसावळ- भुसावळचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, मोठा भाऊ व खरात भावंडाच्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींची पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी जिल्हा कारागृहात भुसावळ येथील नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत संशयीत आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. भुसावळ हत्याकांड प्रकरणी संशयीत आरोपी शेखर हिरालाल मोघे उर्फ राजा बॉक्सर, मोहसीन अजगर खान उर्फ बॉक्सर व मयूरेश रमेश सुरवाडे यांना अटक करण्यात आली होती. ओळख परेडप्रसंगी खरात यांच्या परीवारातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान, गुरूवार, 24 रोजी तिघांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !