मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले ; हुतात्मासह सहा एक्स्प्रेस रद्द


भुसावळ- सलग पाचव्या दिवशी मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेक गाड्या उशिराने धावत असून शुक्रवारी पाच तर शनिवारी एक एक्स्प्रेस रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेस 9 ते 11 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली असून त्या शिवाय अन्य तीन गाड्या शुक्रवारी रद्द झाल्या तर शनिवारीदेखील एक गाड्या रद्द करण्यात आली. दरम्यान, पावसामुळे अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

शुक्रवारी या गाड्या झाल्या रद्द
डाऊन 02009 लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपुर एक्सप्रेस, डाऊन 11083 लोकमान्य टिळक टर्मिनल्स काझीपेट एक्सप्रेस, अप 11084 काझीपेट लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस डाऊन 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस तसेच अप 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस 9 ते 11 ऑगस्टदरम्यान रद्द करण्यात आली असून शनिवारी अप 02010 गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.