विरोधकांच्या दारात फटाके वा गुलाल उधळल्यास दाखल होणार गुन्हे

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा इशारा
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरुवार, 24 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर विजयी झालेल्या उमेदवाराच्या समर्थकांनी विरोधकांच्या घरासमोरून वा दरवाजात फटाके फोडल्यास वा गुलाल उधळून, अर्वाच्च घोषणा दिल्यास तसेच दुचाकीचे सायलेंसर काढून वाहने फिरवल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिला आहे.
विजय संयमाने साजरा करण्याचे पोलिस अधीक्षकांचे आवाहन
निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलचे सायलेंसर काढून विरोधकांच्या घरासमोर घिरट्या घालतात तसेच फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे, अर्वाच्य घोषणा देणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात त्यामुळे वाद होऊन मारामारीसारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे दुष्पपरीणाम नागरीकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात. दुचाकीचे सायलेंसर काढून वाहन फिरवणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईलतसेच ही वाहने जप्त केली जाणार असून कोणत्याही विजयी रॅलीला परवानगी देण्यात येणार नाही शिवाय आतापर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात पण शांततेत पार पाडल्या व जळगावच्या नावाला शोभेल, असे सहकार्य केल्याबद्धल सर्व जळगावकरांचे जिल्हा पोलिस दल आभारी आहे, याचप्रमाणेच मतमोजणी प्रक्रियाही शांततेत पार पडू द्यावी तसेच कायदा सुव्यस्था राखून विजय संयमाने साजरा करावा, असे आवाहन पोसि अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले आहे.
