Bappi Lahiri Passed Away गोल्डन सिंगर बप्पी लाहिरी काळ्याच्या पडद्याआड


Bappi Lahiri Passed Away मुंबई : आपल्या जादूचे आवाजाने बॉलीवूडमध्ये चमक निर्माण करणारे व गोल्डन सिंगर म्हणून परीचीत असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (69) (Bappi Lahiri) यांचे आज मुंबईत निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मुंबईत घेतला अखेरचा श्वास
जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांनी अखेरचा श्वास घेतला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.



अनेक चित्रपटांमध्ये गाणी केली संगीतबद्ध
बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांनी डिस्को डान्सर, हिम्मतवाला, शराबी, अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टारझन, डान्स डान्स, सत्यमेव जयते शोला और शबनम यासारख्या चित्रपटांमधील गाणी संगीतबद्ध केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !