हरीपुर्‍यातील पीर हजरत हसन बाबांच्या उरुसाला 28 पासून होणार सुरुवात


यावल : तालुक्यातील हरीपुरा येथील हिंदू-मुस्लिमसह सर्वधर्मीय बांधवांची मोठी श्रध्दा असलेल्या पीर हजरत हसन बाबा मुरशीद (नक्शबंदी)(रहे.) यांचा तीन दिवशीय उरूस शरीफ येत्या सोमवार, 28 पासुन सुरू होत आहे तर 30 ऑक्टोंबरला रात्री दरगाह परिसरात नामवंत कव्वालंचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. या उर्स शरीफकरीता राज्यासह मध्यप्रदेशातील मोठ्या संख्येत भाविकांची उपस्थिती लाभते. सालाबादप्रमाणे या वर्षीही हरीपूरा, ता.यावल येथील पीर हजरत हसन मुरशीद बाबा नक्शबंदी रहमतुल्ला यांचा नववा उर्स शरीफ व लंगर कार्यक्रम सोमवारपासून सुरू होत आहे. या दिवशी प्रचम कुशाई कार्यक्रम रात्री होईल तर मंगळवारी भव्य संदलीचा कार्यक्रम होईल.

मोहराळा-हरीपुरादरम्यान निघणार संदल
मोहराळा ते हरीपुरा येथुन एक वाजता मोठ्या उत्साहात संदल निघेल तसेच बुधवारी रात्री नऊ वाजता कव्वालीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. यासाठी हरीपुरा, मोहराळा, सावखेडासीम हिंदू-मुस्लीम पंचकमिटीकडून नियोजन केले जात आहे. कार्यक्रमात राज्यासह शेजारील राज्य गुजरात व मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने सर्वधर्मीय बांधव येथे या उर्स शरीफकरीता येतात. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिर्जा ईमाम बेग, संभाजी पाटील, ईकबाल बेग, आसीफ टेलर, तन्वीर बेग, महेबुब शेख, भीमराव थोरवे, सीताराम देवरे, अककील मण्यार, सलीम मिस्तरी, सलीम हवालदार, अब्दुल पेंटर सह हिंदू मुस्लिम पंच कमिटीने केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !