नगरसेवक पिंटू कोठारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव


वाढदिवसानिमित्त भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांनी केला सत्कार

भुसावळ : भुसावळचे साईसेवक, साईजीवन सुपरशॉपीचे संचालक भाजपाचे नगरसेवक पिंटूभाऊ कोठारी यांच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दिवसभर त्यांच्या चाहत्यांसह मित्र परीवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भुसावळचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ सावकारे यांनी जामनेर रोडवरील त्यांच्या कार्यालयात वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करून कोठारी यांना उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, व्हाटस्अ‍ॅप, फेसबुकसह अन्य सोशल मिडीयावरूनही त्यांच्या चाहत्यावर्गाने त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तर दिवसभरात प्रभागातील नागरीक, मित्र मंडळी तसेच राजकीय तसेच सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना उदंड व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती
जामनेर रोडवरील भाजपा कार्यालयात झालेल्या सत्कारप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक युवराज लोणारी, मनोज बियाणी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, किरण चोपडे, अ‍ॅड.निर्मल दायमा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !