मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा भुसावळात चौधरी भावंडांनी केला सत्कार

भुसावळ : मुक्ताईनगरचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करून अनिल चौधरी यांच्या सौभाग्यवती ललिता चौधरी यांनी त्यांचे औक्षण केले तर माजी आमदार संतोष चौधरी व अनिलच चौधरी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व हार घालून स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी, युवा नेते धीरज अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेवक कैलास चौधरी, ऋषी शुक्ला व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
