डाऊन पुष्पकचा अपघात टळला : ईगतपुरी स्थानकात रूळावरून चाके घसरली

ईगतपुरी : डाऊन मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस ईगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवास करीत असताना रूळावरून चाके घसरल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने मोठा अपघात टळला असून प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मुंबईहून निघालेली पुष्पक एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर येत असताना या एक्स्प्रेसचा शेवटचा जनरल डबा रुळावरून घसरला. स्थानकात शिरत असताना या गाडीचा वेग कमी असल्याने मोठी हानी टळली.
