भुसावळात लेवा समाज 16 नोव्हेंबरला वधू-वर परीचय मेळावा

भुसावळ : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजातील विवाहोत्सुक युवक- युवतींचा परीचय मेळावा 16 नोव्हेंबर रोजी शहरातील संतोषी माता सभागृहात होत आहे. मेळाव्याप्रसंगी प्रकाशित होणार्या सुचीमध्ये युवक-युवतींची शैक्षणिक व कौटुंबीक माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. सुचीमध्ये नावे समाविष्ट करण्याची अंतीम मुदत 5 नोव्हेंबरपर्यंत असून नोंदणी अर्ज महासंघाचे मुख्यालय निसर्ग प्लाझा पांडुरंग टॉकीज, भुसावळ येथे उपलब्ध आहेत. यासाठी इच्छुकांनी लवकर नावे नोंदणी करावी, असे आवाहन अॅड.प्रकाश व्ही.पाटील, राजेश सुधाकर चौधरी, देवा वाणी, डॉ.बाळू पाटील यांनी केले आहे.
