चाळीसगावातील डॉ.एम.बी.परदेशींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

चाळीसगाव : 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन शहरातील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.एम.बी.परदेशी यांच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 25 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 7.45 वाजेदरम्यान एका 23 वर्षीय तरुणीवर आयसीयु कक्षामध्ये उपचार सुरू असतांना डॉ. एम. बी. परदेशी यांनी दरवाजा बंद करून उपचार करतो, असे सांगून तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडीत तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बापूराव भोसले करीत आहेत.
