भुसावळातून दुचाकी लंपास


भुसावळ : शहरातील नवशक्ती कॉम्प्लेक्ससमोरून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. 20 रोजी ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदी येथील किरण हरीदास मोराणकर (39) हे 20 रोजी भुसावळात कामानिमित्त आल्यानंतर त्यांनी आपली काळ्या रंगाची दुचाकी (एम.एच.19 बी.ई.4928) नवशक्ती कॉम्प्लेक्सबाहेर लावली होती मात्र काही वेळानंतर दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दीपक जाधव करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !