वाघळूदच्या पोलिस पाटलास मारहाण

यावल : तालुक्यातील वाघळूद येथील पोलिस पाटील समाधान अडकमोल यांना व त्यांचे वडील रवींद्र अडकमोल यांना गावातील सात जणांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी अॅट्रासिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. योगेश सखाराम धनगर, शालिक बाळू धनगर, बाळू श्रावण धनगर, अमोल नामदेव धनगर, ज्ञानेश्वर लक्ष्मण धनगर, सुनिल सखाराम धनगर व अन्नपूर्णाबाई धनगर यांनी लाठ्या-काठ्यांनी व बाळू धनगर याने कुर्हाडीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
