मुसळीतांड्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी झाली गोड

आशादेवी कोटेचा यांच्या वाढदिवसानिमित्त फराळाचे वाटप
भुसावळ : स्व.प्रेमचंद रुपचंद कोटेचा फौंडेशनतर्फे आदिवासी व डोंगराळ परीसरात राहणार्या मुसळीतांडा येथे आशादेवी कोटेचा यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवाळी सणाचे औचित्य साधून नमकीन, मिठाई तसेच चॉकलेट या फराळाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा व कुटुंबीय जे.पी.चोरडिया, सामाजिक कार्यकर्ता कमलेश निकुंभ, विजय चोरडिया, प.क.कोटेचा महिला महाविद्यालय येथील सेवानिवृत्त माजी प्रभारी प्राचार्य प्रा.दिलीप ललवाणी यांच्यासह शालेय समितीचे पदाधिकारी विनोद राठोड, गोरलाल राठोड, समिती सदस्य व गावातील नागरीक आणि जिल्हा परीषद शिक्षक दीपक प्रभाकर सुरवाडे व प्रवीण बाबुलाल मोरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना फराळ वाटप केल्यानंतर त्यांच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहिला. या प्रसंगी प्रा.ललवाणी यांनी मार्गदर्शन केले. प्रशांत कोटेचा यांनी भविष्यात सुध्दा फौंडेशनकडून मदत देण्याचे आश्वासन दिले.
