भुसावळच्या प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे कमोडिटी बँक उपक्रम

भुसावळ : डोंगरकठोरा येथील डोंगरदा या क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांची दिवाळी साजरी व्हावी, त्यांना शाळेचा लळा लागावा यासाठी महाविद्यालयाने भुसावळातील नागरीकांना आवाहन करून त्यांचे सुस्थितीत असलेले कपडे पुस्तक बॅगेची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद मिळाल्यानंतर उपक्रमांतर्गत डोंगरदे येथे आदिवासी बांधवांना कपडे वाटप, विद्यार्थ्यांना फराळ व नवीन चप्पल देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हा परीषद डोंगरदा शाळेचे मुख्याध्यापक मुबारक तडवी, युनूस तडवी, कमोडिटी बँक समन्वयक प्रा.दीपाली पाटील, सदस्य प्रा.नीता चोरडिया, प्रा.निलेश गुरूचल, प्रा.सचिन पंडित, डॉ.सोपान बोराटे, डॉ.गिरीश कोळी तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळेस शाळेच्या विद्यार्थ्यांचा परीरचय घेण्यात आला. त्यांच्याकडून त्यांच्या बोली भाषेतून गाणे गायला सांगण्यात आले. आदिवासी बांधवांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा, डॉ.शिल्पा पाटील, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा, सचिव संजय जी सुराणा तसेच इतर सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले. भुसावळच्या नागरिकांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी कमोडीटी बँकेसाठी आपल्या घरातील जुने कपडे पुस्तके शालेय साहित्य तसेच इतर साहित्य देण्यसाठी आवाहन केले असून साहित्य देण्यासाठी महाविद्यालयात संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.
