धुळ्यानजीक व्यापार्याला लुटले : चौघांविरुद्ध गुन्हा

धुळे : दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी किराणा मालाचे होलसेल व्यापारी अशोक धमनदास दोधानी (वय 52) यांना लुटल्याची घटना 25 रोजी रात्री साडेनऊ वाजता गोंदूर फाटा येथे घडली होती. या घटनेत तीन लाख 40 हजार रुपये लुटून नेल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 25 रोजी राजी किराणा मालाचे पैसे घेऊन दोधानी हे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहराकडे येत असताना कुंडाणे फाट्यापुढील गोंदूर फाट्याजवळ दोन मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चौघांनी वाहन (क्र. एम.एच.14 डी.ए.2659) अडवले तसेच वाहनाची किल्ली काढून घेत पैशाची बॅग हिसकावून दोधानी यांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत पळ काढला होता. या घटनेनंतर अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डेे, सहायक पोलिस निरीक्षक आर.एस. काळे, उपनिरीक्षक एस.ए.भोरकडे यांनी भेट दिली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक आर.एस.काळे करीत आहेत.
