शिरूडमध्ये एटीएम पळवण्याचा प्रयत्न सतर्क ग्रामस्थांमुळे फसला


धुळे : चक्क चारचाकी वाहनाला तार बांधून एटीएम यंत्र पळवण्याचा प्रयत्न सतर्कत शिरूडकरांमुळे फसला तर चोरट्यांना मात्र रीकाम्या हाताने पळ काढावे लागल्याची घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. एटीएम मशीन बाहेर पडल्याचा आवाज झाल्यानंतर ग्रामस्थांना जाग आल्यानंतर त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला तर चोरट्यांनीदेखील ग्रामस्थांच्या दिशेने दगडफेक केली मात्र अखेर चोरटे एटीएम मशीन सोडून पसार होण्यात यशस्वी झाले. दिवाळीनिमित्त एटीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रकमेचा भरणा करण्यात आला आहे मात्र सतर्कतेमुळे बँकेचे मोठे नुकसान टळल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बाभुळवाडी परीसरात मशीन सापडले
शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारात अज्ञात चार चोरटे बोलेरो वाहनातून शिरूड गावातील सेंट्रल बँकेजवळ आल्यानंतर त्यांनी कटरच्या मदतीने एटीएमचे फाउंडेशन कापले मात्र यंत्र जड वाहनात ठेवणे शक्य नसल्याने त्यांनी यंत्राला तार बांधून ही तार वाहनाला बांधली. नंतर एटीएम ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र, ओढून नेताना मोठा आवाज झाल्याने गावातील एकाला जाग आली. एटीएम चोरी लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्यान ग्रामस्थ जागे झाले व त्यांनी चोरट्यांना प्रतिकार केला तर चोरट्यांनी वाहनात ठेवलेले दगड ग्रामस्थांच्या दिशेने भिरकावले त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनीही त्यांच्यावर दगड फेकले. शेवटी घाबरून चोरट्यांनी मशीन बाभुळवाडी परीसरात सोडून पळ काढला. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक रामेश्वर मुळे यांनी तक्रार दिल्याचे सांगण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !