अंतर्नाद प्रतिष्ठान, शैक्षणिक दीपस्तंभ परीवारातर्फे कपड्यांसह फराळ वाटप

वड्री धरणाशेजारील आसराबारीच्या 150 कुटुबीयांची दिवाळी गोड
भुसावळ- भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान व शैक्षणिक दीपस्तंभ परीवारातर्फे यावल तालुक्यातील वर्डी धरणाच्या शेजारील आसराबारीत सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात 150 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दीपोत्सवाच्या निमित्ताने दोन्ही संस्थांतर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील वड्री धरणाच्या शेजारील आसराबारी येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.
यांचे लाभले सहकार्य
भुसावळच्या विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी, नगरसेवक मुकेश पाटील, हरीष फालक, दीपक फालक, संजय मोताळकर, दीपक जावळे, महेंद्र किनगे या दात्यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन, समन्वयक तेजेंद्र महाजन हे होते. भालोद येथील अमोल हरिभाऊ जावळे, ज्ञानेश्वर घुले, श्रीकांत जोशी, प्रभाकर नेहेते, प्रसन्ना बोरोले, दीपक टोके, विक्रांत चौधरी, धनराज नेहेते, हरीष कोल्हे, मिलिंद कोल्हे, किशोर पाटील, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, संतोष मराठे, संदीप रायभोळे, योगेश इंगळे, पुष्कर चौधरी, समाधान जाधव, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, प्रा. श्याम दुसाने, पंकज पाटील, हितेश सरोदे, नितीन पाटील, प्रा. नीलेश गुरचळ, निवृत्ती पाटील, भूषण झोपे, सुनील पाठक, रजिंदर थिंड, देव सरकटे, मंगेश भावे, दीपस्तंभ परिवाराचे अमित चौधरी, अंतर्नाद प्रतिष्ठानचे संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
चिमुकल्यांच्या चेहर्यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. यंदा शैक्षणिक दीपस्तंभ परिवारानेही त्यात सहभाग घेतला. पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले होते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
उपक्रमाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जोरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले. भविष्यात हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख शैलेंद्र महाजन, समन्वयक तेजेंद्र महाजन यांनी दिली. शहरी लोक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.
