रोटरी रेल सिटीतर्फे आदिवासी पाड्यावर दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दिवाळी निमित्त फराळ मुसाळतांडा, महादेव माळ येथील रहिवाशांना तब्बल 250 किलो फराळाचे वाटप करण्या आले शिवाय घरांना पावसामुळे लागलेली गळती थांबवण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या रोटरी दांडिया उत्सवात वापरण्यात आलेले फ्लेक्स बॅनरदेखील येथील रहिवाश्यांना भेट देण्यात आले. बालगोपालांना क्लब तर्फे चॉकलेट वितरण करण्यात आले. हा उपक्रम गत पाच वर्षांपासून सुरू असून तांड्यावरील सर्व पुरुष, महिला व बालगोपाल यांना अतीव आनंद झाला. यशस्वितेसाठी अध्यक्ष अनिकेत पाटील, मनोज सोनार, प्रोजेक्ट चेअरमन सुमित चोरडिया, योगेश अग्रवाल तथा सर्व रोटरी क्लब सदस्यांनी परीश्रम घेतले.
