यावलमध्ये खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

यावल : यावल शहरातील आई हॉस्पिटल समोरील भल्या मोठ्या खड्ड्यात पडल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. यावल येथील महाजन गल्ली रहिवासी व कल्याण येथील नोकरीस तुषार मधुकर महाजन हे दुचाकीवर आपल्या घरी जात असताना यावल भुसावळ रोडवरील खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले. अपघाताची बातमी कळतात नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक धीरज महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार करून पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले.
खड्ड्यांमुळे वाढले अपघात
उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक धीरज महाजन, नगरसेवक गणेश महाजन, अभिमन्यू चौधरी, राजेश पालक यांच्यासह महाजन गल्लीतील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात आला. शहरातील अपघाताची ही दुसरी घटना आहे. बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने यावल तहसील ऑफिसजवळ ज्वारीने भरलेले ट्रॅक्टर पलटी झाल्याने संपूर्ण ज्वारी पाण्यात खराब झाली होती. दरम्यान,
यावल नगरपालिकेच्या नगरसेविका पौर्णिमा फालक यांच्या वतीने अपघात ग्रस्त खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली. प्रगतशील शेतकरी राजेंद्र फालक यांच्यासह अनेकांनी मिळून स्व-मेहनतीने खड्डे बुजवले. दरम्यान, ठेकेदाराने तत्काळ रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास नागरीक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
