भुसावळात बिर्याणी विक्रेत्या महिलेच्या भावावर हल्ला


भुसावळ : शहरातील सोनिच्छावाडी भागातील बिर्याणी विक्रेत्याकडे बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या पाच जणांनी विक्रेत्या महिलेच्या भावावर फायटरने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पाच जणाविंरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोनिच्छावाडी परीसरात बिर्याणी विक्री करणार्‍या वैशाली मधुकर बर्‍हाटे यांच्याकडे हेमंत पैठणकर, बंटी जंजाळकर, चेतन खडसे उर्फ गुर्‍या ऋषभ उर्फ पाव आणि ऋषभचा भाऊ चिन्या हे सोमवारी रात्री आल्यानंतर त्यांनी बिर्याणी मागितली मात्र थोडा वेळ लागेल असे सांगितल्याचा त्यांना राग आला. त्यामुळे संशयितांनी बाजूलाच फटाके फोडत बर्‍हाटे यांचा भाऊ सतीशला फायटरने मारहाण केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !