सावखेडासीममध्ये हाणामारी : परस्परविरोधी गुन्हा


यावल- तालुक्यातील सावखेडासीम येथे अतिक्रमणासंदर्भातील न्यायप्रविष्ट दाव्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. विनयभंग झाल्याप्रकरणी परस्परविरोधी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सावखेडासीमच्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीकृष्ण शांताराम पाटील, सतीश उर्फ किरण शांताराम पाटील, बेबाबाई शांताराम पाटील व किशोर उत्तम पाटील या चौघांनी मंगळवारी पहाटे विवाहितेशी व त्यांच्या कुटुंबियांशी वाद घातला. श्रीकृष्ण पाटील याने घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. वादात संशयितांनी विवाहिता व तिच्या कुटुंबाला मारहाण केली, तसेच विवाहितेचा विनयभंग केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार महेबूब तडवी, सिंकदर तडवी करत आहेत. दुसर्‍या गटातर्फेही 57 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विनायक धना पाटील, मीराबाई विनायक पाटील, उमेश विनायक पाटील व स्वाती विनायक पाटील या चौघांनी भांडण करत फिर्यादी व तिच्या कुटुंबाला मारहाण केली तसेच फिर्यादीचा विनयभंग केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !