मुंबईत उद्या ‘कला सन्मान’ प्रदर्शनाचे उदघाटन


बोदवड : जागृत मरीमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्ट, बोदवड जळगावच्या वतीने प्लॅनेट आर्ट प्रस्तुत ‘कला सन्मान’ प्रदर्शनाचे गुरुवार, 31 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कुमार स्वामी हॉल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, काळा घोडा, मुंबई येथे होत आहे. हे प्रदर्शन 1 ते 3 नोव्हेंबरदरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी सात वाजेदरम्यान खुले राहणार आहे. कलावंतांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी संस्थेचे संस्थापक देविदास राखोंडे आणि सभासद आर्टिस्ट स्वाती यशोदास राखोंडे यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. या प्रदर्शनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 24 आर्टीस्ट सहभागी झाले आहेत. सहभागी कलावंतांना संस्थेकडून कलासन्मान हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जे.एम.डी.संस्था एक चॅरीटेबल संस्था असून अशा समाज सेवी कामासाठी ती ओळखली जाते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी अध्यक्ष निवृत्ती राखोंडे, धनराज राखोंडे, पूनम चौधरी, फोरम शेठ यांचे सहकार्य लाभलेले आहे. कला प्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन राखोंडे गुरुजी व आर्टिस्ट स्वाती राखोंडे यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !