फैजपूरात उद्या निघणार भव्य शोभायात्रा

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
फैजपूर : अखंड भारताचे शिल्पकार तथा माजी केंद्रीय गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंती निमित्त ऐतिहासिक फैजपूर शहरात सरदार वल्लभभाई पटल जयंती उत्सव समिती व लेवा प्रतिष्ठान फैजपूरच्या विद्यमाने गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चित्राची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेच्या उद्घाटनप्रसंगी केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे तसेच आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच सर्व सन्माननीय संत-महंत व आजी- माजी लोकप्रतिनिधी समाजसेवक यांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन भरत कोल्हे, हेमंत भंगाळे, प्रतीक वारके, नीरज झोपे, रीतेश चौधरी, हिमांशू राणे, चिन्मय वाघूळदे, हरीभाऊ सराफ, दीपक होले व सरदार वल्लभाई पटेल जयंती उत्सव समिती, लेवा प्रतिष्ठान फैजपूरतर्फे करण्यात आले आहे.
