ओला दुष्काळ जाहीर करण्याची नामदार हरीभाऊ जावळेंची मागणी

फैजपूर : सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी प्रांताधिकारी यांना ओला दुष्काळाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनाम्यांना सुरूवात झाली आहे. रब्बीचा हंगाम घेण्यासाठी पंचनामे तत्काळ होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने पंचनामे तत्काळ पूर्ण करावे आणि त्या सोबतच ओल्या दुष्काळाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नामदार हरीभाऊ जावळे यांनी प्रांताधिकारी अजित थोरबोले यांना दिल्या आहेत.
तर शेतकर्यांना मिळणार दिलासा
शेतकर्यांचा विमा असेल वा नसेल सरसकट सर्वाना ओल्या दुष्काळाचा लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर झाल्यावर मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांना ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कृषी शिक्षण व संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष नामदार हरीभाऊ जावळे करणार आहेत त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
