मुक्ताईनगर तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात

मुक्ताईनगर : परतीच्या पावसाने मतदारसंघातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ऐन दिवाळीसारखा लखलखाटी सण अंधारात गेल्याने बळीराजा अक्षरशः हतबल झाला असून तत्काळ नुकसान झालेल्या शेती पिकांच्या बांधावर जावून पंचनामे करा, अशा सूचना नुतन आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार शाम वाडकर व तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिवाळीच्या सुट्टीवर गेलेल्या कर्मचार्यांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवार, 30 ऑक्टोबरपासून संयुक्तिकरीत्या पंचानामे सुरू करण्यात आले आहेत. शेतकर्यांनी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
