जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा -डॉ.मधू मानवतकर

भुसावळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भुसावळातील समाजसेविका डॉ.मधू राजेश मानवतकर यांनी जळगाव जिल्हाधिकार्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकर्यांना मदत करणे हे आद्य कर्तव्य मानून शासनाने तत्काळ पॅकेज जाहीर करावे, असे शासनाकडे पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
