मंजूर कामांमध्ये आमदार घालताय ‘खोडा’ : माजी महसूल मंत्री खडसेंची पुन्हा टिका


मुक्ताईनगर : कुंड धरणाच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परीसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींना बारमाही पाणी राहणार असून भविष्यात बंदीस्त पाईप लाईनद्वारे शेतीला पाणी देण्यात येईल व यातून परीसरात समृद्धी येण्यास मदत होईल मात्र स्थानिक आमदार हे मंजूर विकासकामांमध्ये खोडा घालत असून मंजूर कामांना ब्रेक लावण्याचे काम करीत आहेत, असा आरोप माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. शेतीला वरदान ठरणार्‍या जोंधनखेडा येथील गोरक्ष गंगा नदीवरील कुंड धरणाच्या मातीच्या भिंतीची उंची वाढवणे आणि सांडव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या कामाचा शनिवार, 5 रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने तर प्रत्यक्ष धरणस्थळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते झाला. यावेळी खडसे बोलत होते.

बाळ आम्ही जन्माला घालतो मात्र बारसे करताय दुसरे
माजी मंत्री खडसे म्हणाले की, आपण विकास निधी आणण्यासाठी समर्थ आहोत कोणाला जर स्पर्धा करायची असेल तर विकास कामांशी स्पर्धा करावी मात्र आपण विकास कामांसाठी पाठपुरावा करतो व ते मंजूर झाले की इतर श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. बाळ आम्ही जन्माला घालतो आणि बारसे करण्यासाठी दुसरे पुढे येतात, अशी टिका त्यांनी विरोधकांवर टीका केली.



 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !