एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीची हत्या : तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न


सातारा : एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची तरूणाने चाकूने भोसकून हत्या (murder) करण्यात आली त्यानंतर संशयीत आरोपी असलेल्या तरुणानेही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्याला हादरून सोडणारी घटना कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे घडली. या घटनेत पायल विकास साळुंखे (17, रा.पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) (payal vikas salunkhe) या मुलीचा मृत्यू झाला.

तरुणावर दवाखान्यात उपचार
याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक गावातीलच निखील राजेंद्र कुंभार (25) (nikhil rajendra kumbhar)  याने रविवारी सकाळी पायल साळुंखेवर अचानक चाकूने वार केले. यामध्ये पायल गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सातार्‍यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाU दरम्यान, या घटनेनंतर निखील कुंभार यानेही विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार एकतर्फी प्रेमातून (one side love story) झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !