वीज कोसळून चौघांचा करुण अंत

अकोला : शेतात काम करत असताना वीज कोसळल्याने तेल्हारा तालुक्यातील वरुड बु.॥ येथे तीन जणांचा मृत्यू झाला तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. तेल्हारा तालुक्यातील वरुड येथील गणेश वामनराव मोकळकार, नागोराव गुलाबराव अढाऊ, गजानन गुलाबराव अढाऊ, मीना गोपाल नारे, वैष्णवी नागोराव अढाऊ व लक्ष्मी नागोराव अढाऊ हे पाच जण वरुड-भोकर शिवारातील एका शेतात कापूस वेचण्यासाठी गेले असता दुपारी अडीच वाजजाचे सुमारास अचानक वातावरण बदलले व विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी अचानक शेतात वीज कोसळली. यामध्ये गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ हे या तिघांचा मृत्यू झाला तर नागोराव अढाऊ व वैष्णवी अढाऊ हे गंभीर जखमी झाले.
लाडेगाव शिवारात एकाचा मृत्यू
दुसर्या घटनेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.नेत अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करीत असलेल्या दादाराव पळसपगार व अनिल पंचाग यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पंचाग हा गंभीर जखमी झाला.
