दीड लाखांची लाच भोवली : वीज वितरण कंपनीचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात


acb trap sangali सांगली : दीड लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंता राजेंद्र देसाई याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. कंत्राटदाराने केलेल्या कामाची बिले मंजूर करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती.

दिड लाखांवर केली तडजोड
संशयीत देसाई यांनी तक्रारदाराकडे तीन लाखांची मागणी करत दीड लाख रुपयांवर तडजोड केली व लाच घेताच त्यास अटक करण्यात आली. कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने महावितरणमध्ये सांगली विभागात कामे केली आहेत. या कामाची बिले मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता देसाईकडे आली होती. ही बिले मंजूर करण्यासाठी देसाई याने तक्रार दाराकडे लाच मागितली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !