बहिणीला मेहुण्याकडून त्रास : संतप्त शालकाने केलेल्या हल्ल्यात एका मेहुण्याचा मृत्यू तर दुसरा गंभीर


मालेगाव : बहिणीला मेहुण्यांकडून होणार्‍या त्रासानंतर संतप्त झालेल्या भावाने थेट मेहुण्यांवरच चाकूने प्राणघातक हल्ला केल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेत मोहंमद अहमद मुईयुद्दीन (30) यांच्या पोटात चाकू लागल्याने मृत्यू झाला, तर मोबीन अहमद हा जखमी झाला. घटनेनंतर संशयिताने डोक्यावर वार करत स्वत:ला जखमी करून घेतले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता मालेगावातील नवरंग कॉलनी परीसरात हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिसांनी संशयित मोहंमद इम्रान उस्मान गनी याला अटक केली

मेहुण्याविरोधात बहिणीचा छळ केल्याची तक्रार
संशयीत इम्रान गनी हा कुटुंबासह हबीमुल्ला मशिदीजवळ वास्तव्यास आहे. तो नेहमीच पत्नीला मारहाण करून त्रास देत होता. शनिवारीही त्याने पत्नीला मारहाण केली. सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने भावांना बोलावून घेतले. मोहंमद व मोबीन यांनी घरी पोहोचून मेहुणा इम्रान याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने इम्रानने दोन लोखंडी चाकू आणून मुबीनच्या तोंडावर वार केला. मोहंमद हा सोडवण्यास गेला असता इम्रानने त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसला. बरगडीत खोलवर चाकू घुसल्याने मोहंमद गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !