दोन बालिकांवरील अत्याचाराने भुसावळ हादरले

सेवानिवृत्त शिक्षकाला अटक : नराधम आरोपीस न्यायालयाने सुनावली 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी


Bhusawal Rape भुसावळ : दोन दिवसांपूर्वीच धरणगाव तालुक्यातील तरुणीवर शहरात अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच ट्यूशनसाठी आलेल्या पाचव्या इयत्तेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर 75 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार (Rape) केल्याची संतापजनक घटना शहरात जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येलाच उघडकीस आल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. जयंत जोसेफ रायन (75, भुसावळ) (jayant josef rayan) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीस सोमवार, 7 रोजी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार
शहरातील एका नामांकीत शैक्षणिक संस्थेत पाचव्या इयत्तेत 12 वर्षीय पीडीता शिक्षण घेते व दोन वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. आरोपी जयंत रायन यांच्याकडे पीडीतेसह तिच्या मैत्रिणी सकाळी नऊ ते बारा व दुपारी दोन सहा या वेळेत सर्व विषयांसाठी खाजगी ट्यूशनसाठी येत होत्या. गुरुवार, 3 मार्च रोजी आरोपी सेवानिवृत्त शिक्षक व आरोपी जयंत जोसेफ रायन (jayant josef rayan) याने पीडीतेच्या आईला फोन करून 4 रोजी विद्यार्थिनीला व तिच्या एका मैत्रीणीला ट्यूशनसाठी लवकर बोलावल्याने दोघे विद्यार्थिनी क्लाससाठी पोहोचल्या. यावेळी नराधम आरोपीने दुपारी दोन ते चार वेळेत ट्यूशन संपल्यानंतर नवीन स्टेप शिकवायची असल्याचे सांगत दोघांना थांबवून ठेवले तर एकीला शेवभाजी करण्यास सांगून मोबाईलवर गाणे लावण्यास सांगितले व कपल डान्स केल्यानंतर एकीवर अत्याचार केला तर दुसर्‍या दिवशी 5 मार्च रोजी पुन्हा हाच प्रकार पीडीतेच्या एका मैत्रिणीसोबतही केल्याचा आरोप तक्रारीद्वारे करण्यात अ ाला आहे.






आईला आपबिती सांगताच प्रकार उघड
सलग दोन दिवस घडलेल्या प्रकारानंतर दोन्ही पीडीता भयभीत झाल्या व 12 वर्षीय पीडीतेने (वडील नसलेल्या) आपल्या आईला घडलेला प्रकार सांगताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला व त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याशी चर्चा करून घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी लागलीच या प्रकाराची दखल घेत गुन्हा दाखल केला. तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण (bhusawal taluka api rupali chavan) यांनी तक्रार नोंदवून घेतली.

नराधम आरोपीला 9 पर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणी 12 वर्षीय पीडीतेने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 सीसीटीएनएस गुरनं.141/2022 भादंवि 376 (अ, ब) 376, (3) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6 प्रमाणे सेवानिवृत्त शिक्षक जयंत जोसेफ रायन (75) या नराधम सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रविवारी रात्री 10.30 वाजता अटक करण्यात आली. आरोपीला सोमवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला (api mangesh gontla) , कॉन्स्टेबल गजानन वाघ करीत आहेत.

महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच दुर्दैवी घटना उघडकीस
देशभरात मंगळवार, 8 रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात असताना पूर्वसंध्येला मात्र भुसावळातील दुर्दैवी प्रकारानंतर समाजमन हळहळले असून संतप्तही झाले आहे. मुलींसह महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नराधम शिक्षकाने असा प्रकार आणखी कुणासोबत केला आहे का? हा प्रकारदेखील समोर येणे गरजेचे आहे. नराधम सेवानिवृत्त शिक्षकावर आता कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !