जळगावात चोरट्यांची भरली जत्रा : एकाचवेळी लांबवल्या तीन दुचाकी


Jalgaon Bike Chori जळगाव : शहरातील दुचाकी चोरट्यांची टोळी पुन्हा जोमाने सक्रिय झाली असून एमआयडीसी हद्दीतील वेगवेगळ्या भागातन तीन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात (midc police station) तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. वाढत्या वाहनांच्या चोर्‍या रोखण्यात पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने वाहनधारकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

तीन भागातून दुचाकी लांबवल्या
पहिल्या फिर्यादीनुसार, नकुल भास्कर पाटील (31, पाटीलवाडा, मेहरुण) या तरुणाची दुचाकी (एम.एच.19 ए.डी.3120) एमआयडीसीतील बेदमुथा कंपनीच्या बाहेर पार्किंगमधून चोरट्यांनी लांबविली. दुसर्‍या घटनेत एमआयडीसतील एल सेक्टरमध्ये स्टार कुलर्स अ‍ॅण्ड कंडेन्सर या कंपनीच्या बाहेरून ज्ञानेश्वर हेमंत बागुल (31, रा.मेस्को माता नगर, जुना आसोदा रोड एमआयडीसीतील बेदमुथा कंपनीच्या बाहेर पार्किंगमधून या तरुणाची दुचाकी (एम.एच.19 सी.ए.4796) पार्कींगमधून चोरट्यांनी लांबवली. तिसर्‍या घटनेत एमआयडीसीतील एल सेक्टरमधील रेखा पॉलीमर या कंपनीसमोरून रघुनाथ पांडूरंग चौधरी (44, रा.विश्वकर्मा हॉटेजजवळ, रामेश्वर कॉलनी एमआयडीसीतील बेदमुथा कंपनीच्या बाहेर पार्किंगमधून यांची पार्किंगला लावलेली दुचाकी (एम.एच.19 यू.9460) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तीनही तक्रारदारांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !