जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार : फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी
Jalgaon Rape जळगाव : महिलांसह मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाही. जळगाव शहरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो व्हायरलची धमकी देण्यात आली तसेच पीडीतेच्या वडीलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात (jalgaon midc police station) गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची वाच्यता न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी
जळगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. डिसेंबर 2020 महिन्यात शहरातील एका मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी अल्पवयीन मुलगी गेली असता संशयीत दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहित नाही) या मुलाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्या मुलीला काही ना काही कारण सांगून शहरातील फुले मार्केटमध्ये बोलावून तिच्यावर बळजबरी अत्याचार (rape) करण्यात आला. ही घटना घरी कोणालाही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना मारून टाकेल, अशी तरूणाने दिली.




फोटो व्हायरलची धमकी देवून वारंवार अत्याचार
तसेच अल्पवयीन मुलीच्या काकाच्या राहत्या घरी देखील तिच्यावर अत्याचार केला आणि तू जर मला भेटण्यासाठी आली नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या वडिलांना मारून टाकेल, अशी देखील धमकी दिली. या संदर्भात पीडित अल्पवयीन मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने संशयीत आरोपी दीपक सोनवणे (पूर्ण नाव गाव माहीत नाही) (dipak sonawane) याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात (jalgaon midc police station) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.