भाजपाच्या विजयानंतर फैजपूरात पदाधिकार्यांचा ‘विजयोत्सव’
फैजपूर : उत्तरप्रदेशसह उत्तराखंड, गोवा मणिपूर या चार राज्यात भाजपाने विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर फैजपूर शहरातील भारतीय जनता पार्टीतर्फे खंडोबा मंदिर महाद्वार, छत्रपती शिवाजीी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, ओबीसी प्रदेश सचिव भरत महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, विकास सोसायटी चेअरमन राजेश महाजन, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वैभव वकारे, प्रतीक वारके, महिला शाखाध्यक्ष जयश्री चौधरी, ओबीसी शाखाध्यक्ष अनुराधा परदेशी, वसंत परदेशी, दीक्षा पाटील, नरेंद्र चौधरी, रवींद्र सरोदे ,रवींद्र होले, किरण चौधरी, रामा होले,मनोज सराफ ,जितेंद्र वर्मा, संजय भावसार, अक्षय परदेशी यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपा प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत देशप्रेमी नागरीकांनी भारतीय जनता पार्टीला केलेल्या मतदानामुळे भाजपाची विजयी घौडदौड सुरू झाली आहे शिवाय कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली होवून व केलेल्या विकासकामांना मतदारांनी विजय कौल दिल्याची प्रतिक्रिया सरचिटणीस संजय सराफ यांनी व्यक्त केली.
