कर्ज डोईजड झाल्याने गळफास घेत एकाची आत्महत्या


Jalgaon Suside जळगाव : कर्जाचा डोंगर वाढत गेल्यानंतर आहुजा नगरातील 39 अविनाश उर्फ बाळू अरुण बोरसे (39, रा.सुकृती अपार्टमेंट, आहुजा नगर) यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहण्यात आली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घरी कुणी नसताना उचलले पाऊल
अविनाश उर्फ बाळू अरूण बोरसे हा पत्नी व मुलांसह अहुजा नगरातील संकृती अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होता. काही दिवसांपासून अविनाश बोरसे यांच्या पत्नी बाहेरगावी गेल्याने अविनाश घरी एकटाच होता. शनिवार, 12 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अविनाशची आई सुनंदाबाई यांनी फोन लावण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतू फोन लागत नव्हता म्हणून त्यांनी भाचा प्रशांत रमेश पाटील यांना फोन करून माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार प्रशांत पाटील हा घरी गेला असता अविनाशचा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बाल्कनीमधून डोकावून पाहिले असता अविनाशने गळफास घेवून आत्महत्याचे केल्याचे दिसून आले.






कर्जबाजारी झाल्याने उचलले पाऊल
अविनाशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आपण कर्जबाजारी झाल्याने स्वत:च्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !