सातपुड्यात वन कर्मचार्यांवर हल्ला ; चौघांविरुद्ध गुन्हा
यावल- सातपुड्याच्या कंपार्टमेंट क्रमांक 120, नियत क्षेत्र जामन्यात वनरक्षक हुकर्या वेरसिंग बारेला, सोनाली प्रताप बारेला, वनमजुर बहादूर बारेला जयत्राम बारेला व राहुल बारेला आदींना गस्तीवर असताना एक हेक्टरहून अधिक क्षेत्रात अनधिकृतरीत्या वनजमिनीवर सोयाबीनचा पेरा आढळल्याने कर्मचारी पीक नष्ट करीत असताना मध्यप्रदेशातील आंबा, ता.भगवानपूरा जि.खरगोन येथील नानसिंग दादीया बारेला, मंगलसिंग रमा बारेला, बुटर कुटवाल बारेला व दिता टमा बारेला या संशयीतांनी कर्मचार्यांना शिवीगाळ व मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा आणला. बुधवारी ही घटना घडली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री यावल पोलिसात उसमळी वनपाल ललीत रामदास सोनार यांच्या फिर्यादीनुसार चौघा संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.