दारू पाजण्यास नकार देणार्‍या मित्राची हत्या ; कारवाईच्या भीतीने एकाने केली आत्महत्या


बीड : मित्राची दोघा मित्रांनीच दारू न पाजण्याच्या कारणावरून हत्या केली मात्र पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल, या भीतीने संशयीत आरोपी असलेल्या मित्रानेही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी इथे घडल्याने खळबळ उडाली आहे.

खुनाचा उलगडा करण्यात येश
गुरुवार, 10 मार्च रोजी अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे बाबुराव विठ्ठल गडदे (वय 45, रा.चिचखंडी, ता.अंबाजोगाई) यांचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची उघडकीस आली होती. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना यश आले. दारूच्या नशेत दोघा मित्रांनी तिसर्‍याचा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले.



शवविच्छेदन अहवालातून खून उघड
बाबुराव विठ्ठल गडदे हे 9 मार्च रोजी सकाळी 7 वाजता घरातून निघून गेल्यानंतर परतले नसल्याची तक्रार अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. दुसर्‍या दिवशी दुपारी बाबुराव गडदे यांचा मृतदेह गडदेवाडी शिवारात ओढ्याच्या पात्रात आढळून आला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई मध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. या मृत व्यक्तीचा खून गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले. अहवाल येताच पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून वेगाने तपास सुरु केला..

कारवाईच्या भीतीने एकाची आमहत्या
दरम्यान या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी आधी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर या घटनेचा तपास सुरू केला तपास करत असताना अंबाजोगाई पोलिसांना रामचंद्र गडदे आणि महादेव गडदे या दोघांनी हा खून केला असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले होते.. या दोघांच्या तपासासाठी अंबाजोगाई पोलिसांनी तीन पथके तैनात करून त्या दोघांचा शोध सुरु केला. मात्र, यापैकी एकानं पोलिसांच्या कारवाईच्या भितीनं गळफास लावून आत्महत्या केली. दुसरा आरोपी रामचंद्र गडदे हा ऊसतोडीसाठी म्हणून फरार होता.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने वाचला गुन्ह्याचा पाढा
सुरुवातीस आढेवेढे घेणार्‍या रामचंद्र गडदे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. बाबुराव गडदे, महादेव गडदे आणि रामचंद्र गडदे हे तिघे मित्र 9 मार्च रोजी दारू पिण्यास बसले. यावेळी सुरुवातीला त्यांनी महादेव गडदे याच्या जवळील दारू पिली. त्यानंतर महादेव आणि रामचंद्र हे बाबुरावला त्याच्या जवळील दारू पिण्यासाठी बाहेर काढ म्हणून मागे लागले. परंतु त्यासाठी बाबुराव टाळाटाळ करत होता. त्यामुळे चिडून त्या दोघांनी बाबूरावच्याच गळ्यात असलेल्या गमज्याने त्याचा गळा आवळला. त्यानंतर बाबुरावला ओढ्यात टाकून डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेतलल्याची कबुली रामचंद्रने दिली आहे.

आरोपी पोलिस कोठडीत
अंबाजोगाई पोलिसांनी रामचंद्र गडदे यास न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 12 मार्च ते 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. 19 मार्च रोजी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !