पहुर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Rape पहुर : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार (rape) केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पहुर तालुक्यातील एका गावातील पीडीतेने या संदर्भात दिलेल्या तक्रारीनंतर गणेश शांताराम पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बोदवडच्या विवाहितेची आत्महत्या : पतीसह दोघांना अटक
फुस लावून पळवत अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गावातील गणेश शांताराम पवार याने पीडित मुलीला शुक्रवार, 18 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता घरातून फूस लावुन पांढर्या रंगाच्या गाडीतून पळवून नेले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्यावर थांबून गाडीतच मुलीवर अत्याचार (rape) केला. या संदर्भात पीडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी गणेश शांताराम पवार (ganesh shantaram pawar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे (psi sandip chede) करीत आहे.




