सोनसाखळी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात : तीन दुचाकी जप्त


जळगाव : रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी लांबवणे, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने नेमलेल्या पथकाने रविवारी रात्री एका चोरट्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन दुचाकी व सोनसाखळी हस्तगत करण्यात आल्या आहेत. खेमराज तापीराम हिवराळे (21, रा. जिजाऊनगर, वाघनगर) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गेल्या महिनाभरात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. त्यामुळे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील रेवानंद साळुंखे, जितेंद्र तावडे, अजय सपकाळे, विजय खैरे, संजय सपकाळे, दीपक शिरसाठ यांचे पथक तयार करून तपास सुरू केला होता. ओंकारेश्वर मंदिर परीसरात विना क्रमांकाची दुचाकी घेऊन काही तरुण संशयितपणे उभे असल्याची माहिती या पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पथकाने काही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात खेमराज हिवराळे याच्यावर संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मोहननगर, श्रीधरनगर व रायसोनीनगर भागात झालेल्या सोनसाखळी लांबवल्याचे गुन्हे केल्याची त्याने कबुली दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !