शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर बोदवडमध्ये हटले सभापतींचे नामफलक


बोदवड : तालुक्यातील पंचायत समितीचा पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपल्यानंतर नियमाप्रमाणे सभापतींच्या दालनाबाहेरील नामफलक निघणे क्रमप्राप्त होते मात्र नियम धाब्यावर बसवून सभापती, उपसभापतींचे फलक कायम असल्याने शिवसेनेने या संदर्भात आक्षेप घेत चार दिवसात नामफलक न हटविल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता. शिवसेनेच्या इशार्‍याची दखल घेत प्रशासनाने तातडीने फलक हटवले आहेत.

निवेदन देताच नरमले प्रशासन
सोमवार, 21 रोजी गटविकास अधिकारी तथा प्रशासक संतोष नागतिळक यांना शिवसेनेचे अमोल व्यवहारे, सोमेश्वर पाटील व गजानन पाटील यांनी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल गटविकास अधिकारी संतोष नागतिळक यांनी घेत कार्यकाळ संपलेल्या सभापती व उपसभापतींचे नामफलक मंगळवारी हटवले आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !