29 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्रांनी खून : या शहरातील घटना
सांगली : धारदार शस्त्राने वार करून 29 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना शहरातील आंबेडकर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रोहन रामचंद्र नाईक (29, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभरफुटी, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनानंतर चौघे हल्लेखोर पसार झाले आहेत.
तरुणाच्या खुनानंतर संशयीत पसार
रोहन हा पेंटींगचे काम करत होता. सायंकाळी तो घरात बिर्याणीसाठी साहित्य आणतो, असे सांगून बाहेर पडला. आंबेडकर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये तो मित्रासह बसला होता. याच वेळी संशयितही त्याच हॉटेलमध्ये होते. त्यांच्यात वाद झाला. हॉटेलबाहेर वाद मिटविण्यात आला. पण नंतर संशयितांनी रोहनवर पाठीमागून धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाले.


रावेरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; प्रकरण मिटवण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी ; तिघा तरुणांना अटक
खुनाचे कारण अस्पष्ट
यानंतर, रोहनला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खूनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.
भुसावळातील रस्ते रेंगाळले : ठेकेदार दोन वर्ष ब्लॅकलिस्टेड


