वकीलावरील चाकूहल्ल्याचा यावलमध्ये निषेध : दोषीवर कारवाईची मागणी


यावल : वर्धा येथील न्यायालयातील महिला वकिल योगीता मुंन यांच्यावर संशयीत आरोपी भीम गोविंद पाटील याने चाकू हल्ला केल्याची घटना कोर्ट हॉलमध्ये न्यायधिशांसमोर घडल्याने या हल्ल्याचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे. यावल बार असोशिएशनकडून येथील तहसीलदार महेश पवार यांनी बुधवारी निवेदन देत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

नाचताना धक्का लागल्याने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला : दोघांना अटक

दोषीवर कठोर कारवाई व्हावी
वकीलावर हल्ला करणारा संशयीत आरोपी नामे भीम गोविंद पाटील यास तत्काळ कडक शासन व्हावे व वकिलांच्या संरक्षणासाठी अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल तत्काळ मंजुर होवुन तसा कायदा लवकरात-लवकर लागु करावा, अशी मागणी वकील संघाने केली. निवेदन यावल वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.धीरज चौधरी, सचिव अ‍ॅड.निलेश पी.मोरे, अ‍ॅड.राजेश गडे, अ‍ॅड.अशोक सुरवळकर, अ‍ॅड.के.डी.सोनवणे, अ‍ॅड.डी.आर.बाविस्कर, अ‍ॅड.जी.एम.बारी, अ‍ॅड.राजेश बारी, अ‍ॅड.उमेश बडगुजर, अ‍ॅड.निवृत्ती पाटील, अ‍ॅड.एस.जी.कवडीवाले, अ‍ॅड.सुलताना तडवी, अ‍ॅड.संगीता तडवी, अ‍ॅड.विनोद परतणे, अ‍ॅड.दत्तात्रेय सावकारे, अ‍ॅड.शेख, अ‍ॅड.अजय कुलकर्णी, अ‍ॅड.याकुब तडवी, अ‍ॅड.स्वाती साठे, अ‍ॅड.गौरव पाटील, अ‍ॅड.नितीन चौधरी आदींच्या वतीने देण्यात आले आहे.



चार लाखांची लाच भोवली : अक्कलकुवा जि.प.उपविभागाच्या अभियंत्यांसह तिघे एसीबीच्या जाळ्यात 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !